भुसावळ (प्रतिनिधी )-

रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ दरम्यान त्रि साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
*०२१०७ त्रि साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ६.२.२०२१ पासून ३१.३.२०२१ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १६.२५ वाजता सुटेल आणि लखनऊ येथे दुसर्या दिवशी १५.१० वाजता पोहोचेल.
*02108 त्रि-साप्ताहिक विशेष लखनऊ येथून दिनांक ७.२.२०२१ पासून १.४.२०२१ पर्यंत दर दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी २२.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी २३.०० वाजता पोहोचेल.
थांबे आणि संरचना: कोणताही बदल नाही
उपरोक्त विशेष गाडीच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासा दरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड -१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे असे आवाहन रेेल्वे विभागातर्फे केले आहे .


