त्यागमूर्ती माता रमाई यांचा आदर्श महिलांनी घ्यावा -रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त मान्यवरांचा सुर ; मैत्री सागर तर्फे रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –

महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या अनेक संकटांना सामोरे जाऊन महान त्याग करणाऱ्या ,कष्टमय जिवन जगणाऱ्या , त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांचा महिलांनी एकतरी आदर्श घ्यावा, ” असे आवाहन महिला मुक्ति संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ संगीता भामरे यांनी व्यक्त केले . येथील शिवाजी नगरभागातील मैत्र सागर बुद्धविहारात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची 123 वी जयंती उत्साहानेे साजरी करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव महिला मुक्ती मोर्चा संघटना जिल्हा अध्यक्षा तथा बहुजन महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्षा सौ संगिता राजेंद्र भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थाध्यक्षा राजश्री नेवे व पत्रकार उज्वला बागुल होत्या .
सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेंस पाहुणे व मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सौ भामरे यांनी रमाईचे महान त्यागाबद्दल व कार्यावर प्रकाशझोत टाकला . तर प्रमुख पाहुणे राजश्री नेवे व उज्वला बागुल यांनी त्यागमूर्ति, रमाई यांचे कष्टमय जीवनपट उलगडत त्यांची महती सांगितली .

प्रसंगी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महीलांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी सागर बौद्ध विहारच्या महिला दिपाली निळे , पंचशिला जाधव, आशा चोथमल, आरती निकम , वनिता ईगळे व जयश्री नंन्नवरे, नसिम शेख व माधुरी ईगळे यांचेसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या . सुञसंचालन संगिता भामरे यांनी तर दिपाली निळे यांनी मानले . यशस्वितेकरीता प्रमोद निळे व चोथमल काका यांचेसह मैत्री सागर बुद्ध विहारच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *