श्रीराम मंदिर निर्माणसाठी आमदार संजय सावकारेंसह त्यांचे मातोश्रींनी दिला 51 हजारांचा निधी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभूमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. राम मंदिर निर्माणसाठी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी वैयक्तीकरीत्या 51 हजारांचा निधी दिला तर त्यांच्या मातोश्री सुशीलाबाई सावकारे यांनीदेखील वैयक्तिकरीत्या 51 हजारांचा निधीचा धनादेश शनिवारी डॉ.विरेंद्र झांबरे यांच्याकडे सुपूर्द केला.

राम मंदिर हिंदू धर्माची अस्मिता : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, आमचा परीवार सुरुवातीपासून अध्यात्मिक विचारांचा असून राम मंदिरासाठी मला निधी देता आला हे माझे सौभाग्य आहे. हिंदू धर्माची अस्मिता जपली जावी यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून मी वैयक्तिक 51 हजारांचा तसेच आई सुशीलाबाई यांनीदेखील 51 हजारांचा निधी दिल्याचे आमदार म्हणाले. सर्व जाती-धर्माचे लोक राम मंदिर निर्माणसाठी निधी देत असून नागरीकांनीदेखील या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदारांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *