श्रीराम मंदिर निर्माण निधिला भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांनी दिला महिनाभराचा पगार –


भुसावळ (प्रतिनिधी )-
अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारतभर राम जन्मभमी निधी व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनीदेखील एका महिन्याचा पगार निधी म्हणून शुक्रवारी पदाधिकार्‍यांना समर्पीत केला. या प्रसंगी संघचालक डॉ.सोनी आणि कार्यकर्ता सोनू मांडे यांचा चिद्रवार परीवारातर्फे सत्कार करण्यात आला व त्यांना 51 हजार 111 रुपयांचा चेक सुपूर्त करण्यात आला. आमचा परीवार सुरुवातीपासून अध्यात्मिक विचारांचा असून राम मंदिरासाठी मला निधी देता आला हे माझे सौभाग्य असल्याची भावना संदीप चिद्रवार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *