भुसावळ रेल्वे विभागामध्ये मध्ये 65 वा रेल्वे सप्ताह समारोह संपन्न



भुसावळ (प्रतिनिधी )-

भुसावळ रेल्वे विभागामध्ये 65 वा रेलवे सप्ताह शुक्रवार दिनांक 5 रोजी कृष्णाचंद्र सभागृह मध्ये संपन्न झाला. या समारोह मध्ये रेल्वे विविध विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांचे हस्ते प्रशस्ति पत्र आणि 2000 रुपये रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमा दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

भुसावळ विभागाचे रेल्वे 17 कर्मचारी तथा 4 अधिकारी यांना मध्य रेल्वे महाप्रबंधक तर्फे सम्मानित करण्यात आले होते. या समारोह चे सुत्र संचालन रेल्वे स्कूल प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी केले कार्यक्रम ची प्रस्तावना करताना शम एन डी गांगुर्डे यांनी करून रेल्वे सप्ताह आयोजित करण्याचा उद्देश थोडक्यात सांगितला

त्यांनी सांगितले की रेल्वे करिता ज्यांनी महत्वपुर्ण योगदान केले असे 169 कर्मचारी, 06 शाखा अधिकारी यांना प्रशस्ति पत्र व रोख पुरस्कार ने सम्मानित केले गेले. तथा विभाग मधील 07 ग्रुप अवार्ड आणि 7500 रुपये रोख पुरस्कार, सोबत विविध विभागातील 10 डेपोना उत्कृष्ट कार्यसाठी मंडळ शिल्ड 7500 रुपये रोख पुरस्कार ने सम्मानित केले.
अपर मंडळ रेल प्रबंधक . मनोज कुमार सिन्हा याांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मंडल रेल प्रबंधक .विवेक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्व मध्ये भुसावळ विभागाला 4 महाप्रबंधक शील्ड प्राप्त झाले. भुसावल विभाग ने विगत आर्थिक वर्ष मध्ये भरपूर चांगले कार्य केले.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थित सर्व शाखेचे प्रमुख अधिकारी,मान्यताप्राप्त युनियनचे पदाधिकारी तसेच मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन भुसावळ चे अध्यक्ष श्रीमती नीता गुप्ता,उपाध्यक्ष श्रीमती रजनी सिन्हा, महिला कल्याण संघटन भुसावळचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
धन्यवाद आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे द्वारा करण्यात आले. या कार्यक्रमात कोरोना संबंधित नियमाचे पूर्णपणे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *