भुसावळ (प्रतिनिधी )-
लग्नात डायनिंग टेबल दिला नाही तसेच मूलबाळ होत नाही व घर बांधण्यासाठी चार लाख रुपये न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा शारीरीक, मानसिक, छळ करून विवाहितेला घराबाहेर काढल्याप्रकरणी पुण्यातील पतीसह चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तेजस्विनी रोहित परदेशी (गणेश कॉलनी, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार 26 डिसेंबर 2018 रोजी लग्न झाल्यानंतर सासरच्यांनी लग्नात डायनिंग टेबल आणला नाही तसेच मूलबाळ होत नाही तसेच घर बांधण्यासाठी चार लाख रुपये न आणल्याने शारीरीक मानसिक छळ करून विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार आरोपी पती रोहित अशोक परदेशी (देहु रोड, पुणे), सासु अनिता अशोक परदेशी (देहु रोड, पुणे), सासरे अशोक ज्ञानसिंग परदेशी (देहु रोड, पुणे), दीपक ज्ञानसिंग परदेशी (देहु रोड, पुणे) यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



