भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे, ती मागं घ्यावी. कारण या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे म्हणून केंद्र सरकारला जाग येण्यासाठी उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळात शिवसेनेने केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधले आहे. गांधी पुतळ्यापासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावात्मक नियोजनात गाड्या ढकलून केंद्रसरकारचा निषेध केला. डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे एम्बुलन्स सारखी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यावेळेस गंभीर परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीचे प्रतिक म्हणून रुग्णाला खाटीवर नेऊन चार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मार्गक्रमण केले. जय भवानी जय शिवाजी, “केंद्र सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय”, “पेट्रोल डिझेलची शंभरी, मोदी साहेबांना मॅन ऑफ द मॅच करी” अश्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
भुसावळाचे तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देतांना सतत होणारी इंधन दरवाढ मध्यमवर्गीय आणि नोकरदारांचा आर्थिक कणा मोडणारी आहे, अशी भावना उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी मांडली. उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम गोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, नियोजन समिती सदस्य ऍड. मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, शहर संघटक जग्गु खेराडे, शहर संघटक योगेश बागुल यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षण सभापती मुकेश गुंजाळ, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, माजी नगरसेवक दीपक धांडे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, उपजिल्हा युवाधिकारी प्रवीण पाटील, आबा पाटील, गोकुळ बाविस्कर, महिला आघाडीच्या भुराबाई चव्हाण, योगिता सोनार, भारती गोसावी, शिक्षकसेना जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक गजानन निळे, शरद जोहरे, नमा शर्मा, उपशहरप्रमुख पवन नाले, स्वप्निल सावळे, गुणवंत पाटील, उपशहरसंघटक सोनी ठाकूर, नबी पटेल, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख मनोज पवार, अमोल भालेराव, नाना लोखंडे, चंदू चव्हाण, निलेश ठाकूर, राहुल सोनटक्के, किशोर कोळी, विनोद पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे शेख मेहमुद, मंगल शिरोडे, हाशिम तडवी, प्रदीप भुसारे, सुरेंद्र यादव, मोहसीन तडवी, खालीक बागवान व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



