भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्रासह राज्य सरकारच्या परवानगी नंतर भुसावळ येथून सुटणार्या पॅसेजर गाड्या सुरू केल्या जातील तसेच या गाड्यांचे आता मेमू गाडीत रुपांतर केले जात असून भुसावल रेल्वे यार्डात 12 मेमू उभ्या आहेत. सरकारची परवानगी आल्यावर भुसावळ-अमरावती व भुसावळ देवळाली या मार्गासह अन्य मार्गावर मेमू गाडी सुरू होईल शिवाय अर्थ संकल्पात भुसावळ विभागातील विविध कामांसाठी 600 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी गुरुवारी आयोजित ऑनलाईन पत्रकार परीषदेत दिली. रेल्वेच्या विकास कामांची नोंद असलेले पिंक बुक डीआरएम गुप्ता यांना बुधवारी रात्री मिळाल्याने गुरूवारी सायंकाळी माध्यमांना माहिती देण्यात आली . यावेळी
प्रास्ताविक वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी केले. यावेळी विभागात झालेल्या कामांची माहिती देत गुप्ता यांनी अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनच आता विभागात वर्षभर विकास कामे केली जाणार आहे. भुसावळ विभागात यंदा रेल्वे गाड्या या 110 ऐवजी आता लवकरच 130 तासी वेगात धावणार आहे, यामुळे विभागातील रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होणार असल्याने वेळही वाचणार असल्याचे सांगितले. विभागातील जुने पादचारी पूलांचे काम केले जाणार असून आधुनिक पादचारी पूल तयार केले जाणार आहे तसेच लिफ्ट, सरकते लरने लावले जाणार आहे. विभागातील अकोला, भुसावळ आणि नाशिक रेल्वे स्थानकावर एसी प्रतीक्षालय सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर विभागातील अन्य रेल्वे स्थानकांवर सुध्दा एसी प्रतीक्षालय सुरू करण्याचे नियोजन केले आहे. प्लॅटफॉर्मच्या लांबी वाढविण्यात येत आहे.
भुसावळ येथून खडकपूर, दानाकुनी या मार्गावर खास मालगाड्यांसाठी कॅरीडॉर होणार असून याचे सर्व्हेक्षण होऊन या कॅरीडॉरचे काम जून 2022 मध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे या कॅरीडॉरवरून मालगाड्यांची जास्त संख्येने धावू शकणार आहे. त्यांच्या वेगही वाढणार आहे. यासाठी कॅरीडॉरचे सर्व्हेक्षण लवकरच सुरू होत आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे 2030 मध्ये विश्वातील सर्वात मोठे नेटवर्क राहणार आहे. भारतीय रेल्वे ही सर्व दूर राहणार असून प्रवाशांसोबतच प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होणार आहे.



