भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भूमिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभाराबद्दल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयास
सामान्य नागरीकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याचे निराकरण करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी
हल्लाबोल केला. 15 तारखेपर्यंत अनेक वर्षांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी, खुचीला चिटकून जलद काम
करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेविकॉलच्या डब्याची अनोखी अभिनव भेट प्रा.
उत्तम मुरबाडे उपजिल्हा प्रमुख यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली अभिनव भेट देण्यात आली. तो फेविकॉलचा
डचा समोर ठेवून जलद गतीने काम करा आणि सर्व प्रश्न 15 तारखेपर्यंत निकाली काढा असा अल्टीमेटम
दिला.
जनतेची कामे वेळेवर करा, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा, म्हणजे जनतेच्या तक्रारी येणार नाही.
प्रशासनाची आडमुठ्ठी भुमिका भ्रष्टाचारी वृत्तीमुळे शासनाची प्रतिमा मलीन होवू देवू नका, जनतेला उगीच
बिनाकारण फिरवू नका असे तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
या प्रसंगी शिष्ट मंडळातील पदाधिकाऱ्यांना तेथील कर्मचारी, अधिकान्यांना चांगलेच फैलावर घेतले.
उपजिल्हा संघटक बिलास मुळे, उपजिल्हा प्रमुख अॅड. शाम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुुुरवाडे
तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहर प्रमुख निलेश महाजन, बबलू
ब-हाटे, यांनी चर्चा केली.
वारसदारांची नावे लावणे, शेत मोजणी, प्लॉट मोजगी, मयत वारसदारांची नावे कमी करणे, फेरफार नोंदी
याबाबतीत सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी, शहर संघटक, जम्गू खेराडे, शहर संघटक योगेश बागूल, युवा सेनेचे सुरज पाटील, शरद
जोहरे, प्रसिध्दी प्रमुख गोकुळ बाविस्कर आदी उपस्थित होते.



