भुसावळ (प्रतिनिधि )-
मध्य रेल्वे प्रशासन द्वारा शेतकरी लोकासाठी त्यांचा माल बुक करण्यासाठी देवळाली ते दानापुर दरम्यान किसान विशेष पार्सल गाड़ी दिनांक ७ ऑगष्ट २०२०
पासून समयसारणीनुसार चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
या पार्सल गाडी मध्ये , फळे , भाजीपाला , आणि इतर नाशवंत माल बुक करू शकता येईल . हि गाडी आठवडयातुन (हप्ता) एक दिवस चालवली जाईल .
प्रवासा दरम्यान ही गाडी नाशिक , मनमाड , जळगांव , भुसावळ, बुऱ्हाणपूर , खंडवा , इटारसी, जबलपूर , सतना , कटनी , माणिकपूर , चिवकी , वाराणसी , पंडित दिनदयाळ उपाध्याय नगर , आणि बक्सर या ठिकाणी थांबेल .
पार्टी द्वारा अन्य कोणत्या मध्यवर्ती स्टेशनवर थांबा मागणी असल्यास अतिरिक्त थांबा दिला जाऊ शकतो असेही रेल्वे विभागाने कळविले आहे .



