राममंदिर भूमीपूजनसाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी गडावरील पवित्र माती वापरा – शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी व श्रीराम मंदिर ट्रस्ट व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कडे मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधौ )-
देशभरातून आनंद आणि हर्षोल्हासित वातावरणात हजारो पवित्र स्थळांची पवित्र माती तसेच पवित्र नद्यांचे पाणी हे श्रीराम जन्मभूमीच्या पूजनासाठी पाठविले जात आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या येथे राममंदिराचे भूमी पूजन होणार आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिर येथे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय स्वाभिमान व सामाजिक समरसतेचे दर्शन घडणार आहे त्याठिकाणी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र जन्मस्थळ महू येथील पवित्र मातीसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उगमस्थान नागपूर, संत रविदास यांचे काशी येथील जन्मस्थान, सीतामढी येथील वाल्मिकी आश्रम, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातले कचारगड, झारखंड येथील रामरेखाधाम, मध्यप्रदेशातील तंट्या भिल्लाची पुण्यभूमी, श्री हरमंदिर साहिब अमृतसर, दिल्ली येथील जैन लाल मंदिर त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांनी जिथे ७२ दिवस वास्तव्य केले ते वाल्मिकी मंदिर ही त्यातील काही पवित्र स्थळांवरून पवित्र माती येणार आहे. स्वराज्य स्थापने साठी ज्यांनी जीवाचं रान केले असे स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा थोर युगपुरुष छत्रपती शिवाजी यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पवित्र शिवनेरी गडावरील माती सुद्धा अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर भूमिपुजन सोहळ्यास वापरावी अशी मागणी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष तथा प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार अभियान चे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर जावळे यांनी अयोध्या श्रीराम मंदिर ट्रस्ट, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचेकडे केली आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *