जळगांव अधिवक्ता प्रभाग जिल्हाध्यक्ष पदी अॅड.योगेश एस.बाविस्कर यांची नियुक्ती ;


भुसावळ ( प्रतिनिधी )
भुसावळ येथील प्रथित यश वकिल योगेश सुधाकर बाविस्कर यांची प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार व प्रसार समितीचे अधिवक्ता (वकिल) विभाग जळगांव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष  नागेंद्र शर्मा राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रभाग  राजेंद्रकुमार द्विवेदी एवम राष्ट्रीय महामंत्री दिपक मिश्रा यांचे निर्देशवरून महाराष्ट्रचे सहअभियानाचे अभिवक्ता (वकिल) विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमोलसिंग परदेशी यांनी नुकतीच जळगांव अधिवक्ता प्रभाग जिल्हाध्यक्ष पदी अॅड.योगेश एस.बाविस्कर यांची नियुक्ती  जाहीर केली. 
सदर समितीच्या मार्गदर्शक मंडळा मध्ये आयुष
मंत्री भारत सरकार यशको श्रीपाद नायक,भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शाम जाजु,निवृत्त ले.जनरल डॉ. डी. पी. वत्स्य राज्यसभा सांसद असुन सदर योजनेच्या समितीच्या न्ड् अॅम्बेसिडर म्हणुन श्रीमती हेमामालीनी या आहेत. तसेच राष्ट्रीय संघटक जयघोष महाराज आहे तसेच जयाप्रदा राष्ट्रीय अध्यक्षा महिला मोर्चा या समितीचे संपूर्ण भारतात विविध राज्यां मध्ये संघटन आहे .
प्रधान मंत्री जन कल्याण प्रचार व प्रसार समिती केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजना विदयार्थी,युवक व महिला,वृद्ध, शेतकरी,बेरोजगार, विधवा, अपंग कामगार,अनाथ उदयोजक यांच्या पर्यत पोहचविण्याचे प्रचार व प्रसाराचे कार्य सदर समिती करते.जनतेसाठीच्या या विविध कल्याणकारी योजनांची
योग्य प्रकारे अंमलबजावणी होते किंवा नाही याची सुद्धा पडताळणी करून त्याचा सातत्याने आढावा घेत असते व सदर योजनेचा पाठ पुरावा करुन संबंधीत योजनेचा लाभ जनतेला मिळवून  देण्याचे कार्य करत आहे. जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन व प्रशासना पर्यत
पोहचविण्यासाठी दुवा म्हणुन कार्य करीत आहे. या प्रधानमंत्री जन कल्याण प्रचार व प्रसार समितीचा विधी विभागाचा विस्तार जळगांव जिल्शयातील संपूर्ण तालुक्यां मध्ये करणार असल्याचे प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना तळागळातील सर्वसामान्यां पर्यत पोहचविणार असल्याचे
अॅड. योगेश बाविस्कर यांनी सांगितले तसेच त्यांनी 
जिल्हा उपाध्यक्ष अॅड. रमाकांत सुदाम माळी, जिल्हा संयोजक सुरेंद्रसिंग रणजितसिंग चौहान,  दिनेशसिंग दिलीपसिंग राजपुत, अॅड. सचिनकुमार मंगल श्रावगी, जिल्हा महामंत्री,  अॅड. गोविंदा मधुकर वारी आदीची जिल्हा कार्यकारणी घोषित केल्याचे नव नियुक्ती जिल्हाध्यक्ष अॅड. योगेश एस . बाविस्कर यांनी  प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *