भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या महामारीच्या युद्धात देश लढत असताना केंद्र सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांवर पाठीत खंजीर खुपसला आहे .या निर्णयाचा , देशव्यापी लोकशाही पद्धतीने निषेध केला जाईल अश्या प्रतिक्रिया ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, वरणगावच्या कर्मचाऱ्यांनी दिल्या.
केंद्र शासन एकीकडे आत्मनिर्भर बनविण्याचे सांगताय तर दुसऱ्याकडे संरक्षण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्राला विदेशी गुंतवणूक पोहोचवली. सरकारचा निर्णय खेदजनक असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून स्वर्गीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्वासन दिले होते की कुठल्याही परिस्थितीत फॅक्टरीचे निगमीकरणं किंवा खासगीकरण होणार नाही तसेच ऑडनस फॅक्टरी चे उत्पादन क्षमता ३० हजार कोटी पर्यंत वाढणार होते आणि हे सर्व आश्वासन ठरले. सरकारने ९० हजार कर्मचाऱ्यांनी हा आघात केलाय आता संरक्षण क्षेत्रात सरकारचा वाटा फक्त २६ टक्के एवढाच आहे. भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती आली व ७४ टक्के मालक आहेत त्यांनी भारत संरक्षण उत्पादन देण्यास नकार दिला तर देश अडचणीत येऊ शकतो, आयुध निर्माणी कर्मचारी संघ भुसावळ संलग्न भारतीय संघ याचा निषेध करीत असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्या.
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी ला हजार तर वरणगाव ओडणेस फॅक्टरी ला सुमारे तीन हजार कर्मचारी कार्यरत आहे कोरोनाच्या महामारी मध्ये शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सर्व संघटनांना सोबत घेऊन लढा करण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्या.
” वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑडनस फॅक्टरी निगमीकरण करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे .देश महामारी कोरोना आजाराशी लढत असताना केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कार्य केलेले आहे हे कदापि सहन केले जाणार नाही इतर संघटनांना सोबत घेऊन देशव्यापी लढाई लढली जाईल.
प्रकाश कदम
केंद्रीय कार्यकारणी सदस्य
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ
“ऑडनस फॅक्टरी अडीचशे वर्षापासून देशाची सेवा करीत आहे, जगात नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये सुरक्षेचे सामग्री तयार करण्यात येतात . स्वातंत्र्य काळापासून देशाची अविरत सेवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. अचानक ऑडनस फॅक्टरी निगमीकरण करण्याचा निर्णय देश विरोधी कारवाई सारखेच आहे हे कदापि सहन केले जाणार नाहीत.
सच्चानंद गोदवानी
संघटन सचिव
राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी महासंघ



