भसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना आजाराच्या लाॅकडाऊन मुळे देशभरात रेल्वे,बस व सर्व वाहतुक बंद झाली होती.या बंद वाहतुकीमुळे राज्य सरकारच्या खर्चाने दिल्ली येथे युपीएससी-एमपीएससीचे क्लासेस करणारे विद्यार्थी अडकले होते.

जळगाव २७,बुलढाणा३०,अकोला २४,अमरावती २०,यवतमाळ १७,नागपूर ३३,गोंदीया ८,भंडारा ११,वर्धा १४,चंद्रपुर १७,गडचिरोली ८,धुळे १४,नंदुरबार ९,औरंगाबाद ३१,जालना १३,परभणी २५,नांदेड ३२ व हिंगोली येथील १५ असे एकूण ३६७ विद्यार्थी दिल्ली येथे अडकले होते.राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून अडकलेले ते सर्व विद्यार्थी आज दि.१७ मे रविवार रोजी विशेष रेल्वेने भुसावळ येथे सुखरुप परतले.
भुसावळ स्थानकावर विद्यार्थी पहोचताच त्यांची आरोग्य तपासणी करुन होम क्वरंटाईनचे शिक्के मारण्यात आले.


