भुसावळ शहरात मोफत वितरणासाठी २७ टन तांदूळ प्राप्त –

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या काळात लाभार्थींना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळाचे मोफत वितरण शासनाकडून केले जाणार असून पहिल्या टप्प्यातील २७ टन तांदूळ रविवारी तहसीलच्या पुरवठा विभागाला प्राप्त झाला आहे. आता शहरातील ५६ दुकानांमधून पात्र लाभार्थींना वितरण सुरू होणार आहे. केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार पात्र लाभार्थींना मोफत धान्य वितरण केले जाणार होते. एप्रिल महिन्याचा रेशन कोटा वितरीत झाल्यानंतर आता या धान्याची लाभार्थीसह दुकानदारांनाही प्रतीक्षा होती. रविवारी भुसावळ तहसीलच्या गोदामात दोन ट्रक अर्थात २७ टन तांदूळ प्राप्त झाला आहे. यातील काही दुकानदारांना हा तांदुळ पोहोच करण्यात आला आहे मात्र मनुष्यबळ कमी असल्याने उर्वरीत दुकानदारांना दोन दिवसांत तो पोहोच केला जाईल. या सोबतच दुसर्‍या टप्प्यातील तांदूळ देखील लवकरच मिळणार असल्याने तालुक्यातील सर्व १२१ धान्य दुकानांमधूनही वितरण सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *