जळगाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युवासेना अध्यक्ष तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेचा जळगाव शिवसेनेने तिव्र निषेध केला .
यावेळी महापालिकेपासून ते टॉवर चौकापर्यंत धिक्कार मोर्चा काढण्यात आला. यानंतर टॉवर चौकात शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी टरबुजे फोडून देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. प्रसंगी जोरदार घोषणा करण्यात आल्या.राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. वारीस पठान यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेने बांगड्या घालाव्यात असे आरोप फडणवीस यांनी केले होते. याचा जळगावात शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसैनिकांनी टरबूज फोडून फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा निषेध केला. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भराव्यात’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. गुरुवारी दुपारी जळगाव जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते टॉवर चौकात एकत्र जमले होते. त्यांनी फडणवीस यांच्याविरोधात तिव्र निषेध व्यक्त करून जोरदार निदर्शने केली.




