महिलादिन व शिवजयंतीसाठी महिला समिती गठीत

भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतिक महिला दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) निमित्त जळगाव रोड परिसरातील महिलांनी एकत्र येउन बैठक घेऊन समिती गठित केली. भुसावळमध्ये प्रथमच अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. दिनांक ८ मार्च ते १२ मार्च २०२० दरम्यान जळगाव रोड विभागातील श्रीनगर, अयोध्या नगर, भोई नगर, हुडको कॉलनी, गणेश कॉलनी, विद्या नगर, खैळवाडी, काशीराम नगर, भुसावळ हायस्कूल परिसर, रेल दुनिया, मुक्ताई कॉलनी, अष्टविनायक कॉलनी भागातील महिलांनी उत्सव समिती स्थापन केली.
८ मार्च रोजी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला पॉक्सो कायदा मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना समुपदेशन तसेच मुली व महिलासांठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधून महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे.
महिलांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केले जाणार असून या कार्यक्रमात महिला लाभार्थीसाठी मुद्रा लोन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत रोजगार नोंदणी या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
परिसरातील होतकरू व कर्तृत्ववान महिलांसोबत सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिला सशक्तीकरण व सबलीकरण यासाठी काम करून नावलौकिक मिळविलेल्या महिलांना, आजी माजी सैनिक पत्नी, तसेच वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांना गौरवण्यात येणार आहे.
दिनांक ९ रोजी शालेय साहित्य वाटप, १० रोजी रुग्णांना फळे वाटप, ११ रोजी आरोग्य शिबिरात स्त्री रोग, बालरोग, शल्यचिकित्सा, अस्थीरोग, असंसर्गजन्य रोग चिकित्सा, नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा, मानसोपचार, त्वचारोग, दंतचिकीत्सा करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. यामध्ये याशिवाय किशोरवयीन मुलामुलींच्या समस्यांविषयी समुपदेशन करण्यात येणार आहे.
या आयोजन समितीच्या अध्यक्ष प्रा.सीमा धीरज पाटील, उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिनेश खैरनार, सचिव कविता विशाल ठोके, सहसचिव पूजा खैरनार, खजिनदार प्रीती भूषण राणे, सहखजिनदार योगिता शशिकांत दुसाने, सदस्य प्रज्ञा यतीन ढाके, रुपाली शंतनू पाथरवट, अल्का भगत, सायली खैरनार, ललिता पाटील, कोमल पाटील, पल्लवी कोळी, कोमल पाटील, नयना उदय बोंडे, प्रतिभा किशोर चौधरी, अर्चना दिनेश झटकार, रिना भुषण ठोके यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे. बैठकीत यतीन ढाके, अशोक नारायण बेंडाळे, किशोर चौधरी, टिकाराम राणे, प्रा.धीरज पाटील, विशाल ठोके, भूषण ठोके, शंतनू पाथरवट, सुरज चौधरी, दिनेश खैरनार, प्रवीण पाटील, श्याम खैरनार, विकास झांबरे, भूषण राणे, दुर्गेश पाटील, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *