भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलचा शनिवार दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.यावेळी सौ संगीता बियाणी (सेक्रेटरी रा.शि. स.) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी प्रिंसीपल डी.एम. पाटील, प्रिंसीपल कामना पराशर, प्रिंसीपल सोफीया फ्रान्सीस यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. मनस्वी सपकाळे,अनम फातिमा खान यांनी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व उत्साह वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच दहावीची विद्यार्थिनी गुंजन चौधरी,रितू सदाशिव पाटील यांनी आपल्या शाळेविषयीच्या भावना,शालेय जीवनाचा आढावा व्यक्त केला,संगीता बियाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुण,पेपर सोडवण्याबाबत सूचना तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन यशाची परंपरा कायम ठेवा असा सल्ला दिला.




