भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातील शेगांव येथे दिनांक १५ फेब्रूवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न होत आहे विभागातुन श्रध्दाळू भाविक दर्शनासाठी जाणार यामुळे गर्दीत वाढ होन्याची शक्यता असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ – बडनेरा दरम्यान विशेष पैसेंजर गाड़ी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
त्यानुसार गाड़ी क्रमांक 51285 डाउन भुसावळ – बडनेरा ही विशेष पैसेंजर गाड़ी १४ व १५ फेब्रूवारी रोजी भुसावळ येथून ७.३० वाजेला निघणार असून , मलकापुर ८.३८ ला , तर शेगांव येथे ९.३० ला ,व अकोला ११.१० ला , मुर्तिजापुर ११.५६ , व बडनेरा येथे १.३० वाजेला पोहचेल .
गाड़ी क्रमांक – 51286 अप बडनेरा – भुसावळ पैसेंजर ही विशेष गाड़ी दिनांक १५ व १६ फेब्रूवारी रोजी बडनेरा येथून ९ वाजेला प्रस्थान , मुर्तिजापुर ०९.४६ ला , अकोला १०.३० ला , शेगांव ११.५ , मलकापुर १२.१० ला , भुसावळ येथे २.५५ वाजता पोहचेल . गाड़ी ही पैसेंजर असून सर्व स्टेशन वर थांबणार आहे .
भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .



