भुसावळ (प्रतिनिधी )-
जुन्या वाहनांच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये आरटीओ विभागाचा त्रास वाढला आहे. या त्रासाच्या विरोधात लवकरच मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच जून्या वाहन खरेदी विक्री व्यवसायीकांच्या अडचणी सोडवल्या जातील, अशी ग्वाही भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे प्रदेश खजीनदार नीलेश अजमेरा यांनी केले. शहरात आयोजीत संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील बादशहा मोटर्स येथे सोशल डिस्टंन्सींग व कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या मेळाव्यात प्रदेश खजीनदार नीलेश अजमेरा हे प्रमुख पाहूणे व मार्गदर्शक होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जून्या वाहनांच्या खरेदी विक्री व्यवसायामध्ये आरटीओ विभागाचा त्रास वाढला आहे. या संदर्भात अनेक तक्रारींबाबत व वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांच्या नेतृत्वात लवकरच मंत्रालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. यासोबतच संघटनेचा विस्तार वाढवून सर्व सभासदांचे इन्शुरन्स काढायचे असून आरोग्याबाबतही जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्याच्या अध्यक्षपदी ऐहतेशाम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हितेश पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी हर्षल मावळे, अजय पाटील, मनोज पाटील, राकेश पांडे, सिध्दीक खाटीक, आसिफ पटेल, अमित शेख आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन भागवत सैंदाणे यांनी केले. तर यशस्वीतेसाठी रईस शेख, नबाब शेख, अकबर खान, मुजीब खान, तरबेज खान, कान्हा अग्रवाल, आलीम खान, फारुख शेख, इमरान खान, जावेद बागवान, अमोल कोळी , राजू काझी आदींनी परिश्रम घेतले.

फोटो – शहरात भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदेश खजीनदार नीलेश अजमेरा, व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष हितेश पाटील आदी.


