भुसावळ (प्रतिनिधी )-
हतनूर पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठयात प्रचंड वाढ झाली
. धरणातून १ लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना नदीपात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मात्र हतनूर धरणाच्या ४१ दरवाज्यातून होणारा ‘जलप्रपात’ व तापी नदीचा रुद्रावतार जणू भुरळ घालीत असून हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक व नागरिक धरणावर व तापी पुलाकडे गर्दि करीत आहे .



