भुसावळ (प्रतिनिधी )-

शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गेल्या ३ वर्षापासून गणेशाेत्सवांतर्गत ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम राबवण्यात येतो.गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गाेरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा काेणत्या साहित्याची गरज अाहे, त्याची नाेंद करायची. दात्यांनी केलेल्या मदतीतून ते साहित्य पुरवायचे,असा हा उपक्रम अाहे.यंदा या उपक्रमाचे चवथे वर्ष आहे. यावेळी अंतर्नाद आणि उषा फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.२३ ऑगस्ट पासून उपक्रमाला सुरवात होणार आहे.
गणेशाेत्सवाचे पावित्र्य राखून अनाठायी खर्च टाळून ताे सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा, यासाठी अंतर्नादने गेल्या ३ वर्षांपासून ‘समर्पण गणेशाेत्सव’ उपक्रमाची मुहूर्तमेढ राेवली अाहे. मूर्तीची उंची वाढवण्याची स्पर्धा, डाेळ्यांना त्रास हाेईल असा अनावश्यक राेषणाईचा झगमगाट, डीजेचा दणदणाट, कर्णकर्कश संगीत यांच्यावर जाे अनावश्यक खर्च हाेताे त्यात बचत करून गणेशमंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी गाेरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी शैक्षणिक साहित्य भेट द्यावे, या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येतो.ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आणि दिलीप जावळे यांच्याशी संपर्क साधावा, असे अावाहन करण्यात अाले अाहे.
गेल्या वर्षी ४ शाळांत उपक्रम राबविण्यात आला त्यात कुऱ्हा येथील उर्दू जिल्हा परिषद शाळा, वासंती महाजन प्राथमिक विद्यामंदिर भुुसावळ, भुसावळ नगरपालिका शाळा क्रमांक १ , आणि आदिवासी पाड्यावर अशा चार ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात अाला. त्यात साधारण ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात अाले हाेते. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून या वर्षी उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचे नियाेजन करण्यात अाले अाहे.
मातीच्या मूर्तींसाठी प्राेत्साहन
पर्यावरण संवर्धनाचा विचार रूजण्यासाठी यंदा प्रतिष्ठानतर्फे शाडूमातीच्या गणेशमूर्ती स्थापनेला प्राेत्साहन दिले जात अाहे.त्यासाठी शाडू मातीपासून गणेश मुर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळाही घेण्यात आली होती.कार्यशाळेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यालाच ‘एक दुर्वा समर्पणाची’ या संकल्पनेची जाेड देण्यात अाली अाहे. दरवर्षी या उपक्रमाला जाे प्रतिसाद मिळत आहे त्यातूनच उत्साह वाढत आहे असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.
या उपक्रमाचे प्रकल्प म्हणून अमितकुमार पाटील ,समन्वयक ,निवृत्ती पाटील तर सह समन्वयक भूषण झोपे आणि उपक्रम समितीत ज्ञानेश्वर घुले ,जीवन महाजन ,प्रदिप सोनवणे,योगेश इंगळे ,विक्रांत चौधरी
देव सरकटे ,प्रा.श्याम दुसाने ,जीवन सपकाळे ,प्रमोद पाटील ,अमित चौधरी,समाधान जाधव ,सचिन पाटील आणि उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे
हे असणार आहेत.


