मृत रेल्वे कर्मचाऱ्याचा कुटूंबाला ३० हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मृत रेल्वे कर्मचाऱ्याच्‍या कुटूंबाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी,कर्मचारी कल्याण कोषची स्थापना ‘संरक्षक’ तथा विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेक कुमार गुप्ता व अप्पर विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक मनोज कुमार सिन्हा यांच्‍या अध्यक्षतेखाली “मे” २०२० पासून या योजने अंतर्गत रेल्वे सेवेमध्ये मृत्यू पावलेल्या मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्‍या कुटुंबाला आर्थिक सहायता ३० हजार रु. देण्यासाठी कर्मचारी कल्याण कोष योजनेची स्थापना करण्यात आली आहे .
या अंतर्गत ‘मे’ महिनात मृत झालेल्‍या कर्मचाऱ्याच्‍या कुटूंबास दि.८ जुलै बुधवार रोजी ३० हजाराचा धनादेश देण्यात आला.
कर्मचारी कल्याण कोष योजना सुरू करण्यासाठी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यानी अथक परिश्रम घेतले. तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी, भुसावळ मंडळाचे सर्व कार्मिक अधिकारी व कल्याण निरीक्षकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *