भुसावळ (प्रतिनिधी )-
इयत्ता ९ वी,१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण विभाग मंत्री ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांना ऑनलाइन निवेदन देवून येथील
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव तथा अध्यक्ष सुरत्न फाउंडेशन भुसावळ
मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे .
कोरोनाव्हायरस या आपत्तीमुळे राज्यातील अनेकांच्या हाताचे काम गेले असून ते आज जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच गत वर्षी आलेल्या वारंवार आपत्तीमुळे शेतकरी ही हवालदिल झालेला आहे .तसेच शेतकरी व मजुरी करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना सत्र २०२० व २१ मध्ये पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य कसे विकत घ्यावे हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे
करिता महाराष्ट्र शासनाने या कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता इयत्ता नववी, दहावी, व बारावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य देऊन न्याय द्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव तथा अध्यक्ष सुरत्न फाउंडेशन भुसावळ
मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे .



