भालोद (प्रतिनिधी) - दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन संस्थेच्या दप्तरात संस्थेच्या कामकाजाविषयी समाधानकारक नोंद केलेली आहे . बाबासाहेबांची ही भेट ब्रिटिश सरकारने नेमलेल्या स्टार्ट समितीच्या कामकाजाचा भाग होता , ही भेट शासकीय असल्याने त्यास अनन्यसाधारण महत्व आहे . या ऐतिहासिक घटनेचे महत्व लक्षात घेता न्यू इंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर दालन ' निर्माण करण्यात यावे अशी मागणी भीम स्मृती संवर्धन समिती चे मुख्य संयोजक व प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केली आहे .
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये बाबासाहेबांच्या भेटीच्या स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी सांगितले की, या दालनात बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो , त्यांचे ग्रंथ , त्यांचेवरील संशोधनपर निवडक ग्रंथ , भव्य प्रतिमा , काचेच्या पेटीत संरक्षित शेरे बुक , संविधानाची प्रत व अन्य ऐतिहासिक बाबी संग्रहित ठेवाव्यात . विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्या करिता बाबासाहेबांच्या नावे एखादे पारितोषिक देण्यात यावे . दरवर्षी विद्यार्थ्यांची या भेटी संबंधाने निबंध स्पर्धा घ्यावी .
भाषणा नंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याध्यापक आर. एस. जावळे यांना दिले . मुख्याध्यापक जावळे यांनी सदर निवेदन संस्थेचे चेअरमन यांना देऊन तुमच्या भावना कळविल्या जातील असे स्पष्ट केले .
या प्रसंगी प्रदीप सपकाळे , मुकुंद सपकाळे , डॉ. उल्हास तासखेडकर, डॉ. प्रकाश वानखेडे, ॲड. आनंद कोचुरे, डॉ. चंद्रकांत भालेराव , डॉ. गौतम नन्नवरे , रमेश तायडे , नथु अहिरे , गोपाळ भालेराव , चंद्रगुप्त सुरवाडे , दिलिप सपकाळे , बाबुराव वाघ , चेतन नन्नवरे , रमेश भालेराव , अशोक सैंदाणे, बेबीनंदा वाघ , मीना भालेराव , राहुल भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते .
सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक आर. एस.जावळे यांनी पूजन करून बाबासाहेबां विषयी माहिती दिली .
प्रदीप सपकाळे यांनी शेवटी संस्थेचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले .