भुसावळात दहा दिवसीय महिला उपासिका शिबिराचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा, भुसावळ यांच्या वतीने तक्षशिला बौद्ध विहार, वरणगाव रोड, भुसावळ येथे दहा दिवसीय महिला उपासिका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन महिला जिल्हा अध्यक्षा प्रियंका आहिरे यांच्या  हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ शहर अध्यक्षा प्रतिभा सोनवणे होत्या.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस सुरेखा गायकवाड यांनी केले.

या शिबिरास दहा दिवस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सचिव लताताई तायडे ह्या आहेत तर शिबिरास उपस्थित महिलाना दहा परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले. प्रमुख उपस्थीत शहर कोषाध्यक्ष श्रवण साळुंके, केंद्रीय शिक्षक अरुण तायडे, निलेश जाधव, सुनंदा निकम, तसेच महिला शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी कमल निकम, विद्या तायडे, प्रमिला म्हस्के, छाया भोसले, शोभा गायकवाड, छाया रगडे उपस्थित होत्या.

सदर शिबिराचे नियोजन तक्षशिला नगरातील महिला मंडळाने केले होते. यावेळी सर्वप्रथम भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली. वंदन करून त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक महिला मंडळाने प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले.

शिबिराचे महत्त्व व शिबिरातील दहा दिवसांच्या विषयांबाबत माहिती लताताई तायडे, प्रियंका आहिरे व वैशाली सरदार यांनी उपस्थित महिलांना दिली. कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष प्रतिभा सोनवणे यांनी केली. शेवटी तक्षशिला नगरातील महिला मंडळाने सर्वांचे आभार मानले.

दहा दिवस चालणाऱ्या या महिला उपासिका शिबिरामुळे उपस्थित महिलांना धम्माची जाणीव, उपासिका म्हणून कर्तव्य व दैनंदिन जीवनात बौद्ध तत्त्वांचा उपयोग याबाबत लता ताई तायडे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या उपक्रमास भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.