बोदवड(प्रतिनिधी) - दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित, जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका शाखा बोदवड यांच्या विद्यमाने आयोजित *भव्य श्रामणेर - बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे (दि. ११/१०/२०२६ ते दि. २०/१०/२०२६)* उद्घाटन समारोह सोहळा तक्षशिला बुद्धविहार, साकला कॉलनी, बोदवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या १० दिवसीय शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात श्रामणेर संघाचे उपाध्याय पूज्य भंते राज ज्योती, अकोला यांच्या हस्ते महामानवाच्या पूजनाने व धम्म वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोदवड तालुकाध्यक्ष शांताराम मोरे गुरुजी हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक व १० दिवसीय केंद्रीय शिक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष . विजय कांबळे गुरुजी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष. सुमंगल तथा रविंद्र अहिरे गुरुजी, पुष्प पूजेसाठी महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. के. वाय. सुरवाडे गुरुजी व जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग . रविंद्र वानखेडे, दीप पूजेसाठी जिल्हा सरचिटणीस . सुशील कुमार हिवाळे व जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. डॉ. संजीव सावळे गुरुजी उपस्थित होते. तर धूप पूजेसाठी . संघरत्न दामोदरे, . भिमराव पवार, . शैलेंद्र जाधव, उत्तम खराटे व केंद्रीय शिक्ष. बी.के. बोदडे सर उपस्थित होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सर्वश्री आद महाराष्ट्र राज्य पर्यटन सचिव . के. वाय. सुरवाडे गुरुजी , जिल्हा सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. संजीव सावळे, संरक्षण उपाध्यक्ष प्रमुख मेजर आद. रमेश सावळे, जिल्हा पर्यटन सचिव . वसंतदादा लोखंडे, जिल्हा संघटक . उत्तम सुरवाडे गुरुजी, . ए.टी. सुरडकर, उत्तम खराटे, जामनेर व मुक्ताईनगर तालुक्यातून आलेले पदाधिकारी, . ए.पी. जोहरे व बोदवड तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबिर दि. ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत १० दिवस चालणार असून या शिबिरात बौद्ध धम्माचे संस्कार, श्रामणेर प्रशिक्षण, बौद्धाचार्यांची कर्तव्ये याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आयोजक - *भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा, बोदवड* यांनी केले असून बोदवड तालुका कार्यकारिणीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


