मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२६ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपुर ते अकोला, नागपूर ते भुसावळ, सोलापूर ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत. १) पुणे -नागपूर विशेष अनारक्षित गाडी (४ फेरी) 01215 विशेष गाडी दिनांक १९.१०.२०२६ आणि २१.१०.२०२६ रोजी पुणे येथून १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.३० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01216 विशेष गाडी दिनांक २०.१०.२०२६ आणि २२.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पुणे येथे पोहचेल. थांबे - दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह. २) नाशिकरोड ते नागपूर विशेष अनारक्षित मेमू (४ फेरी) 01217 विशेष गाडी दिनांक १८.१०.२०२६ आणि २०.१०.२०२६ रोजी नाशिकरोड येथून १८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01218 विशेष गाडी दिनांक १९.१०.२०२६ आणि २१.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.२० वाजता नाशिकरोड येथे पोहचेल. थांबे - मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा (फक्त 01217 साठी) शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: १२ कार मेमू ३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (४ फेरी) 01019 विशेष गाडी दिनांक १९.१०.२०२६ आणि २१.१०.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01020 विशेष गाडी दिनांक २०.१०.२०२६ आणि २२.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल. थांबे - दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (२ फेरी) 01219 विशेष गाडी दिनांक १८.१०.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01220 विशेष गाडी दिनांक १९.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल. थांबे - दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ५) नागपूर -अकोला विशेष गाडी (४ फेरी) 01131 विशेष गाडी दिनांक २०.१०.२०२६ आणि २१.१०.२०२६ रोजी नागपूर येथून १८.४० वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल. 01132 विशेष गाडी दिनांक २१.१०.२०२६ आणि २२.१०.२०२६ रोजी अकोला येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. थांबे: अजनी, वर्धा ,पुलगाव, धामणगाव, बडनेरा आणि मूर्तिजापूर. गाडीची संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन. ६) भुसावळ ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (४ फेरी) 01213 विशेष गाडी दिनांक २१.१०.२०२६ आणि २२.१०.२०२६ रोजी भुसावळ येथून ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.२० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01214 विशेष गाडी दिनांक २०.१०.२०२६ आणि २१.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळ येथे पोहचेल. थांबे - मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: ०८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७) सोलापूर ते नागपूर विशेष अनारक्षित गाडी (२ फेरी) 01029 विशेष गाडी दिनांक १९.१०.२०२६ रोजी सोलापूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01030 विशेष गाडी दिनांक २०.१०.२०२६ रोजी नागपूर येथून २३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता सोलापूर येथे पोहचेल. थांबे - कुर्डूवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा आणि अजनी. संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. सर्व संबंधितांना विनंती आहे प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


