,भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील वरणगाव हतनुर येथील राज्य राखीव पोलिस दलाचे (SRPF) बटालीयन १९
प्रशिक्षण केंद्र जामखेड जिल्हा अहमदनगर येथे हलवल्याने भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व ग्रामीणच्यावतीने आम्ही महाराष्ट्र सरकारचा तिव्र शब्दात धिक्कार करण्यात आला असून याबाबत प्रांताधिकारी यांना शनिवार २७ रोजी निवेदन देण्यात आले आहे .
भाजप सरकारच्या कार्यकाळात जे प्रकल्प मंजुर केले गेले, जुन्या प्रकल्पांना चालना दिली गिली, ते प्रकल्प सध्याचे सरकार अन्य जिल्ह्यात पळवून
नेत आहे. नविन प्रकल्प जिल्ह्यात आणण्याची ताकद यादळभद्री सरकार मधे नाही. या सरकारने नविन
प्रकल्प जिल्ह्यात आपल्या स्वत:च्या ताकदीवर आणावे, आयत्या बिळावर नागोबा अशा प्रकारची वर्तवणुक
बंद करावी. महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी हे पोलिस प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यात सुरू व्हावे म्हणुन आतोनात प्रयत्न केले. या प्रकल्पाला तत्कालीन काळात चालना दिली. भुसावळ
विधानसभेचे आमदार संजय सावकारे यांनी वेळोवेळी यासंदर्भात पाठपुरावा केला.
सन १९९५ साली युती सरकारच्या कार्यकाळात या पोलिस प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाल्यानंतर
शेतकऱ्यांनी आपल्या भागात येणाया प्रशिक्षण केंद्रासाठी आपल्या जमिनी दिल्या. १९९९ मधे तत्कालीन
गृहमंत्री स्व.गोपिनाथ मुंडे, तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते भुमीपुजन झाले.
यानंतर मात्र ही प्रक्रिया थंडावली. या अधिग्रहणानंतर तब्बल १६० एकर जमिन आज धुळ खात पडून आहे.
त्यानंतर १३ सप्टेंबर २०१९ मधे पुन्हा भाजप सरकारच्या काळात राज्य राखिव पोलिस बल केंद्राची
स्थापना करण्यास व पदे भरण्यास मंजुरी मिळाली. निधी मिळाला तसेच प्लान व डिझाईन सर्व तयार झाले.
या संदर्भात माजी एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, आ.गिरीष महाजन, खासदार रक्षाताई
खडसे यांनी पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प जिल्ह्यातून पळवून नगर जिल्ह्यात नेल्यामुळे शासनाने एक
प्रकारे या भागातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलेली आहे. हा प्रकल्प रद्द केल्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्हावासियांमध्ये या आघाडी सरकारबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारचा हा निर्णय अधाशीपणाचा आहे.
हा केवळ भुसावळ मतदार संघावरच नव्हे तर जळगाव जिल्ह्यावरच अन्याय आहे.
आर.आर.आबा पाटील हे तत्कालीन गृहमंत्री असतांना त्यांनी वरणगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र न हलवता स्वत:च्या मतदार संघात नविन पोलिस प्रशिक्षण केंद्राला मान्यता दिली. हाच आदर्श जर विद्यमान सरकारने घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. सरकारला जिथे कुठे असे प्रशिक्षण केंद्र सुरू करायचे असेल तिथे त्यांनी करावे तो त्यांचा प्रश्न आहे पण वरणगाव येथिल पोलिस प्रशिक्षण केंद्र अन्य
जिल्ह्यात हलवू नये अशी मागणी करण्यात आली आहे . निवेदन देते समयी आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, यांचेसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते .
विद्यामान सरकारने हा पळवून नेलेला प्रकल्प पुन्हा जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे पुर्नप्रस्थापित
करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व ग्रामीणच्या वतीने करण्यात येत आहे. जळगाव
जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आपली पत वापरून हा प्रकल्प पुन्हा वरणगावला खेचून आणावा
अशी मागणी भाजप पादाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे . जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरीकांच्या वतीने ही मागणी
केली असून वेळ पडली तर या निर्णयाविरुद्ध न्यायालयात सुध्दा दाद मागु हे पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत होवू नये यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
निवेदनावर आ.संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे , प्रा.डॉ.सुनिल नेवे, उपनगराध्यक्ष सईदा शेख शफी,
गटनेता मुन्ना तेली, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,
तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, पवन बुंदेले,अमोल महाजन,
प्रशांत पाटील , दिलीप कोळी, सभापती मनिषाताई पाटील, उपसभापती वंदनाताई उन्हाळे , जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांचेसह महेश सोनवणे, गणेश धनगर, राजेन्द्र चौधरी , देवा वाणी , राजू खरारे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी, बूथ प्रमुख , व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या स्वाक्षरी आहेत .



