भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील बियाणी चेंबर्समध्ये गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाची स्थापना करून पूजन करण्यात आले.या मंगल प्रसंगी विनोद बियाणी व स्मिता बियाणी यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना आणि पूजन करण्यात आले. या सोहळ्याला बियाणी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन तथा बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आनंदोत्सवात पियुष बियाणी,व्यवस्थापक गोपाळ ठाकूर,राजीव पारिख,राजू मोरे यांच्यासह बियाणी ग्रुपचे इतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर उपस्थित भाविकांना आणि कर्मचाऱ्यांना मोदक व प्रसादाचे वाटप करण्यात आले. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण बियाणी चेंबर्सचा परिसर भक्तीमय झाला आहे.
यावेळी मनोज बियाणी यांनी बाप्पाला पाऊस पडण्यासाठी साखळे घातले.चांगला पाऊस पडावा व शेतकरी राजाला दिलासा मिळावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणपती बाप्पा जवळ केली.
फोटो कॅप्शन - भुसावळ येथिल बियाणी चेंबर्स मध्ये गणपतीची स्थापना प्रसंगी विनोद बियाणी,स्मिता बियाणी,मनोज बियाणी व पियुष बियाणी.