भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलगांव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम आणि सुरळीत करण्यास मदत होणार आहे. या कामाच्या अनुषंगाने ०७ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्व-नॉन-इंटरलॉकिंग काम करण्यात येणार असून, ०८ सप्टेंबर २६ रोजी नॉन-इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येणार आहे. ०८ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ०६.०० ते १८.०० वाजेपर्यंत १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. या कामामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम पुढीलप्रमाणे - दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी गाड्याचे रद्दीकरण - * गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी - भुसावळ मेमू इगतपुरी येथून रद्द * गाडी क्रमांक १११२० भुसावळ - इगतपुरी मेमू भुसावळ येथून रद्द * गाडी क्रमांक ११११३ भुसावळ - देवळाली मेमू भुसावळ येथून रद्द * गाडी क्रमांक ११११४ देवळाली - भुसावळ मेमू देवळाली येथून रद्द * गाडी क्रमांक ६११२९ नाशिक रोड -बडनेरा मेमू नाशिक रोड येथून रद्द * गाडी क्रमांक ६११३० बडनेरा - नाशिक रोड मेमू बडनेरा येथून रद्द. दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी गाडयांचे नियमन - * गाडी क्रमांक २२५९० हडपसर -बनारस अमृत भारत एक्सप्रेस माहेजी स्थानक येथे ०२ तास ५० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक १२६२७ बेंगलोर -नई दिल्ली एक्सप्रेस पाचोरा स्थानक येथे ०१ तास ४० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस - छपरा एक्सप्रेस गालन स्थानक येथे ०१ तास ३५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक २२३६० मुंबई - पटना एक्सप्रेस कजगाव स्थानक येथे ०१ तास १५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक १७३६३ हुबळी - योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस वाघळी स्थानक येथे ०१ तास १० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर एक्सप्रेस चाळीसगांव स्थानक येथे ०१ तास नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक २२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस - कामाख्या एक्सप्रेस हिरापूर स्थानक येथे १५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०७२ बालिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भादली स्थानक येथे २ तास ४५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक २२५८९ बनारस - हडपसर अमृत भारत एक्सप्रेस भुसावळ स्थानक येथे ०२ तास ३० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर -मुंबई एक्सप्रेस भुसावळ स्थानक येथे ०१ तास ४५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक २२८४६ हटिया -पुणे एक्सप्रेस वरणगाव स्थानक येथे ०१ तास ४५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक २२५३७ गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दुसखेडा स्थानक येथे ०१ तास ३५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०६२ जयनगर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सावदा स्थानक येथे ०१ तास १५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०४० गोंदिया - कोल्हापूर एक्सप्रेस बोदवड स्थानक येथे ०१ तास नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक ११०११ मुंबई - धुळे एक्सप्रेस नांदगाव स्थानक येथे २० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक १२७५३ हजुर साहिब नांदेड -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कजगाव स्थानक येथे ०१ तास २५ मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक १२७१५ हजुर साहिब नांदेड - अमृतसर एक्सप्रेस नायडोंगरी स्थानक येथे ४० मिनिटे नियमन करण्यात येईल. * गाडी क्रमांक १२१०३ पुणे–लखनऊ एक्सप्रेस हिसवळ स्थानका येथे २० मिनिटे नियमन करण्यात येईल. गाड्याचे पुनः निर्धारण - * गाडी क्रमांक २६१०२ अजनी - पुणे वंदे भारत एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दिनांक ०८.०९.२०२६ रोजी अजनी येथून १२.५० वाजता सुटेल. (निर्धारित सुटण्याची वेळ ०९.५० वाजता). * गाडी क्रमांक १९००४ भुसावळ -दादर एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दिनांक ०८.०९.२०२६ रोजी भुसावळ येथून १८.४० वाजता सुटेल. (निर्धारित सुटण्याची वेळ १७.४० वाजता). प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे दिलगीर असून, भविष्यात अधिक सुरक्षित, सक्षम आणि सुरळीत रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे नॉन-इंटरलॉकिंगचे काम अत्यंत आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


