कार्तिक ठाकूर यांच्या तत्परतेने चेतन ठाकूर, पियुष गुरव, कृष्णा साळी व सहकाऱ्यांनी केली मदत भुसावळ, प्रतिनिधी | दि. २२ ऑगस्ट : रात्रीचे दोन वाजले असताना कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका वासराच्या मदतीसाठी महाराणा प्रताप शाळेच्या पाठीमागील घटनास्थळी पोहोचले. वासरावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने वासरू गंभीर जखमी झाले आज. रात्रीची वेळ असल्याने तातडीने उपचार आणि मदतीची व्यवस्था करणे आव्हानात्मक होते. मात्र, गोप्रेमींच्या टीमने वेळेची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून जखमी वासराला मदत केली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी वासरावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आणि रात्रभर त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने वासराची प्रकृती चिंताजनक होती. गोप्रेमींच्या टीमने शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, अपयश हाती आले .गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान सकाळी वासराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्राणीमित्रांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्री एका मुक्या जीवाच्या मदतीसाठी तत्काळ धावून जात कार्तिक ठाकूर, चेतन ठाकूर, पियुष गुरव, कृष्णा साळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणीसेवेचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. जीव वाचविण्यात यश आले नसले तरी वासराला वेळेत उपचार आणि मदत मि6ळावी यासाठी टीमने केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या निस्वार्थी सेवेसाठी गोप्रेमींच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, तर मृत वासराला भावपूर्ण श्रद्धांजली.


