माझा गट, माझं कुटुंब’ उपक्रमाची भुसावळ तालुक्यात दमदार सुरुवात ; सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ अंतर्गत वराडसीम व कुऱ्हा पानाचे येथे प्रशिक्षण; १३ शेतकरी गटांचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी) : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ‘माझा गट, माझं कुटुंब (MGMK)’ या प्रशिक्षण कार्यक्रमाची अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दमदार व यशस्वी सुरुवात झाली. गटशेतीला अधिक सक्षम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणास भुसावळ तालुक्यातील १३ शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रशिक्षणाचे दोन ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता वराडसीम येथे, तर दुपारी २ वाजता कुऱ्हा पानाचे येथे प्रशिक्षण सत्र पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. राजेश हिवरे सर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने झाली. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी गटशेतीची संकल्पना, SOP ची प्रभावी अंमलबजावणी, स्पर्धेचे स्वरूप तसेच आकर्षक बक्षिसे याविषयी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी संवादामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह, जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण झाला. ‘माझा गट, माझं कुटुंब’ या उपक्रमाच्या यशस्वी प्रवासाची यानिमित्ताने दमदार सुरुवात झाली.

यावेळी उमेद व कृषी विभागाच्या मेंटर्सनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. एकत्रित प्रयत्न, योग्य मार्गदर्शन आणि महिला शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग यामुळे गटशेतीची ही चळवळ निश्चितच अधिक सक्षम होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी आपापले जेवणाचे डबे सोबत घेऊन आले होते. प्रशिक्षणानंतर सर्वांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. या आपुलकीच्या आणि एकजुटीच्या वातावरणात ‘माझा गट, माझं कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवास आली.

यावेळी  राजेश हिवरे सर , विभागीय समन्वयक, पाणी फाउंडेशन ,विनोद पाटील सर , BMM, उमेद -,संगिता पाटील मॅडम , कृषी मेंटर ,राहुल ठोसर सर , उमेद मेंटर,वसुरज काळे सर सहाय्यक कृषी अधिकारी  प्रियंका पाटील मॅडम , उमेद मेंटर- प्रियंका बैसाणे मॅडम , फिल्ड ऑफिसर- जावेद गाडीवाले सर , फिल्ड ऑफिसर आदी मान्यवर उपस्थित होते.

“एकजूट, योग्य नियोजन आणि SOP ची प्रभावी अंमलबजावणी... हाच यशस्वी गटशेतीचा पाया!” या संदेशासह प्रशिक्षण कार्यक्रमात गटशेती अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.
कुऱ्हा पानाचे 
वराडसीम