भुसावळ ( प्रतिनिधी ) - भुसावळ दि,१७ ऑगस्ट; शहरातील जुन्या माल गोदामात रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी एका अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. गोदामाचा दरवाजा उघडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आत पाहणी केली असता एका अज्ञात व्यक्तीचे डोके लटकलेल्या अवस्थेत, तर खाली सांगाडा पडलेला दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे 3:35 वाजेच्या सुमारास आर.के.पांडे (TI/HQ/BSL) यांनी भुसावळचे सीजीएस श्री.विजय रामटेक यांच्याशी जुन्या माल गोदामातील काही जुने सामान घेण्याबाबत फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर सीजीएस विजय रामटेक यांनी खासगी कामगार शेख इरफान यांना गोदामाची चावी देऊन जुन्या माल गोदामाकडे पाठवले. दरम्यान, शेख इरफान आणि आर.के.पांडे हे सुमारे 4 वाजता जुन्या माल गोदामात पोहोचले. गोदामाचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर आतून अतिशय तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दुसरा दरवाजा उघडून आत पाहिले असता समोर एका अज्ञात व्यक्तीचे डोके लटकलेल्या अवस्थेत दिसले, तर त्याचा सांगाडा खाली पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पुढील कार्यवाहीसाठी आरपीएफ,जीआरपी तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सांगाडा नेमका किती दिवसांपासून गोदामात होता, संबंधित व्यक्तीची ओळख काय आहे आणि मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. फोटोAI...


