स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये १४ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली ;


भुसावळ (प्रतिनिधी ) - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा जागर करण्यासाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रातर्फे शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

“एक तिरंगा, एक भारत, एक भावना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत शहरातील मतदारसंघातील सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या रॅलीला अष्टभुजा देवी मंदिरापासून सुरुवात होणार असून, रॅलीचा समारोप शहीद राकेश शिंदे स्मारक – पी.ओ. नाहटा कॉलेज येथे होणार आहे. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणांसह नागरिक या रॅलीत सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी भावनेला उजाळा देत राष्ट्रप्रेम, एकता आणि अखंडतेचा संदेश देणाऱ्या या तिरंगा रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भुसावळ विधानसभा क्षेत्र, भुसावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.