झारखंडातील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ भुसावळात अभाविपचे आंदोलन

.भुसावळ (प्रतिनिधी) - झारखंड लोकसेवा आयोग, झारखंड कर्मचारी निवड आयोग तसेच इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी झारखंडमधील विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) भुसावळ शाखेतर्फे गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी शहरातील पु.ओं. नाहाटा चौफुली परिसरात निषेध प्रदर्शन करण्यात आले. .लाठी हल्ल्याचा केला निषेध

यावेळी अभाविप कार्यकर्त्यांनी पेपरफुटीची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे बंद करा अशा घोषणा देत झारखंड सरकारच्या कारवाईचा जाहीर निषेध केला.