रावेर | प्रतिनिधी
भाजपाचे माजी खासदार व माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे (67) यांचे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबई येथे उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या ३ जून पासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना मंगळवार १६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.
जिल्ह्याच्या राजकारणातील एक अष्टपैलु व्यक्तिमत्व गमावल्याने जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे .



