आशा वर्करांचा कामबंद करण्याचा इशारा – प्रांताना दिले निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आशावर्कर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका योद्धयाचे कार्य करीत आहे , मात्र यांना शासनाने अडीच महीने उलटले तरी देखील मानधन दिले नाही तसेच सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य न मिळत असल्याने शुक्रवार १२ जुन रोजी भुसावळ येथील आशा वर्कर यांनी कामबंद करण्याबाबत प्रांतांना निवेदन देण्यात आले .
राष्ट्रीय शहरीआरोग्य अभियानाअंतर्गत आशा वर्कर यांना कोरोना संबंधी काम करताना संरक्षण साहित्य नसतांना काम करावे लागत आहेत आशा वर्कर या दररोज कोरोना च्या सर्वेक्षणासाठी कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये सर्वेक्षणासाठी जात असतात त्याठिकाणी त्यांना स्वतःच्या संरक्षणार्थ मिळणाऱ्या पीपीइ कीट ,मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर न मिळता सुद्धा त्यांना कोरोना बाधित रुग्णांच्या कंटेन्मेंट झोन मध्ये वरिष्ठाधिकारी कर्मचारी नसतांना सुद्धा सर्वेक्षणासाठी त्या प्रभागात पाठवले जाते.त्या प्रसंगी प्रभागातील लोकांकडून चुकीची वागणूक दिली जाते. मोबाईलची नासधूस करत ट्यालीशीट फाडणे अश्या एक ना अनेक संकटांना सामोरे जावे लागते अश्या परिस्थितीत जीविताची हमी कोणीच घेत नाही शासकीय कर्मचाऱ्यांना घरी बसवून काम करण्याची मुभा व भरपूर पगार ४७ डिग्रीच्या तापमानात दिवस रात्र काम करून देखील पुरेसे मानधन नाही यामुळे आशा वर्कर्स यांचेवर उपासमारीची वेळ आज येऊन ठेपली आहे तरी शासनाकडून नियोजित सुविधा व मानधन तसेच सुरक्षेची हमी द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व अशावर्कर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रामसींग सुलाने ,मुख्याधिकारी किरण सावंत,तहसीलदार दीपक धीवरे,यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *