शहरासह रेल्वेभागासाठी ८०० क्युसेकचे आवर्तन ; संभाव्य पाणीटंचाईवर मात, बुधवारी पोहोचेल पाणी

भुसावळन(प्रतिनिधी) –

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्याने तापीबंधाऱ्यातील तल गाठला होता. यामुळे हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यास शहरावर पाणीकपातीची भीती होती. मात्र हतनूर धरणातून शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता ८०० क्युसेस वेगाने आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे शहरातील पाणीटंचाई टळली आहे. शहरात बुधवारपर्यंत (दि. १५) हे आवर्तन बंधाऱ्यात पोहचेल, अशी आशा आहे.

भुसावळ शहर आणि मध्य रेल्वे भुसावळ प्रशासनाने केलेल्या मागणीनुसार हतनूर धरणातून शुक्रवारी सायंकाळी ८०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातून सोडलेले पाण्याचे आवर्तन मिळाल्याने आता शहरासाठी आगामी ३० ते ३५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना कालबाह्य असल्याने ११ ते १२ दिवसांआड पाणी मिळते. आवर्तनाला अजून काही दिवस विलंब झाला असता तरी शहराच्या पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती होती. मात्र भुसावळ विभागीय रेल्वे व भुसावळ नगरपालिका या पाणीवितरण संस्थांसाठी आवर्तन देण्यात आले आहे. यामुळे तूर्ततरी

भुसावळ शहराने गेल्या काळात ३५ ते ४० अशाच्या दरम्यान स्थिरावले आहे. यामुळे या काळात ३५ दिवस जलसाठा पुरला. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळाला. मात्र आता आगामी काळात तापमान ४२ अंशांवर गेल्याने जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढेल. यानंतर दर ३० दिवसांनी पाण्याची गरज भासणार आहे.

आवर्तनाचा लाभ होईल

मध्य रेल्वे, दीपनगर व भुसावळ शहर या तिन्ही वापरकर्त्यांना आवर्तनाचा फायदा होईल. आगामी बुधवारपर्यंत रेल्वे व पालिकेच्या बंधाऱ्यात ते पोहोचेल. यामुळे भुसावळकरांना दिलासा मिळेल. – एस.जी. चौधरी, उपविभागीय अभियंता, हतनूर धरण.

शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची चिन्हे आहेत. आवर्तन पोहोचण्यास अजून चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत उपलब्ध साठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

फोटो ….. संग्रहित