भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ तालुक्यातील साकरी येथे दोन निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलींच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जय संताजी तेली समाज महिला मंडळ व भुसावळ शहर तेली समाजाच्या वतीने प्रांताधिकारी, भुसावळ यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सौ. कविता अशोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, सौ. वैशाली चौधरी व उपाध्यक्षा सौ. रेखा योगेश धुपे , सहसचिव प्रतिभा योगेंद्र चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक ०२/०२/२०२६ रोजी सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, साकरी (ता. भुसावळ) येथे शुक्रवार दिनांक २७/०१/२०२६ रोजी दोन निष्पाप अल्पवयीन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलून अमानुषपणे हत्या करण्यात आली. हा प्रकार केवळ गुन्हा नसून संपूर्ण मानवतेवर झालेला घोर आघात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मुली व पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवून दोषी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त होईल, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी प्रांताधिकारी कार्यालयात मा श्री निमते यांनी भुसावळ शहर तेली समाज व जय संताजी महिला मंडळाच्या वतीने निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी सौ. कविता अशोक चौधरी, उपाध्यक्षा सौ. रेखा योगेश धुपे, सौ. वैशाली सुनील चौधरी, महिला पदाधिकारी सहसचिव प्रतिभा योगेंद्र चौधरी, भारती चौधरी, सुरेखा संजय चौधरी, पुष्पा सुरेश चौधरी, उज्वला बागुल, फाल्गुनी संजीव चौधरी, कोमल संदीप काळे, दिपाली योगेश चौधरी, सुजाता अनिल चौधरी, मोनाली किशोर चौधरी, प्रतिभा चौधरी, सुजाता सपकाळ, साधना कुंदन वानखेडे, राजश्री सुरवाडे, निर्मला सुरवाडे, मनोरमा कैथवास यांच्यासह
भुसावळ शहर तेली समाजाचे कार्यकारिणी अध्यक्ष संजय चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी, सुरेश चौधरी, अशोक चौधरी, सुभाष चौधरी तसेच महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


