जळगाव (प्रतिनिधी ) – खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई पुण्यतिथीनिमित्त लेवागणबोली दिनानिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड तर्फे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी ‘ओवी गाई बहिणाबाई’ काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले. काव्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन वराडे अंबरनाथ हे होते. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक वराडे यांनी बोलीभाषा या मानवी भावभावनांचे सहजोद्गार असतात त्या उपजतच आत्मसात केल्या जातात बोलीचे प्रकटीकरण सहजरित्या होत्या असते असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजूमामा) होते. राजू मामा भोळे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणातून अशा प्रकारची संमेलने सातत्याने होत राहिली तर बोली भाषांच्या संवर्धनाला मोलाची मदत होईल असे बहिणाबाईंची बोलीभाषा टिकवायची तिचे संवर्धन करायची जबाबदारी यापुढील साहित्यिकांनी समर्थपणे सांभाळावी असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय अध्यक्ष श्री प्रकाशदादा पाटील यांनी मांडले.कार्यक्रमाला अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रदेशाध्यक्ष श्री.प्रदीप (बंडू )भोळे, केंद्रीय अध्यक्ष श्री. प्रकाशराव पाटील, बहिणाई प्रदेशाध्यक्ष श्रीमती आशाताई दिलीपराव कोल्हे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.अखिल भारतीय लेवापाटीदार युवक महासंघातर्फे बहिणाबाई चौधरी पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी एका साहित्यिक महिलेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार देण्याच्या हेतूने झालेल्या ठरावानुसार प्रथम वर्षाचा पुरस्कार प्रा.संध्या महाजन यांना देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक तसेच लेवागणबोलीचे अभ्यासक श्री.अरविंद नारखेडे यांच्या ‘खयमाना’ या पुस्तकाचे प्रकाशन या काव्यसंमेलनात करण्यात आले. या काव्यसंमेलनाला माजी महापौर सौ.सीमाताई सुरेश भोळे यांचे सौजन्य लाभले.बहिणाबाई चौधरी स्मारक समिती अध्यक्ष श्री.किशोर चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणतीसून सौ.स्मिता चौधरी तसेच परिसरातील ज्येष्ठ कवयित्री मायाताई धुप्पड,ज्येष्ठ साहित्यिक श्री.शशिकांत हिंगोणेकर, प्रा.डाॅ.जतिन मेढे,अ.फ.भालेराव, श्री राजेंद्र रायसिंग साहेब,प्रा.डाॅ. श्रीकांत तारे, महासंघाच्या पदाधिकारी हर्षा बोरोले, वैशाली झोपेहजर होत्या .तसेच काव्यसंमेलनाला परिसरातील तब्बल ४५ कवीवर्य आणि कवयित्री यांचा सहभाग लाभला.
या काव्यसंमेलनाचे संयोजन प्रा.संध्या महाजन,सुनिता येवले नारखेडे यांनी केले . सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वंदना नेमाडे-महाजन आणि डॉ. डिंपल पाटील यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सौ. हर्षा बोरोले, सुरेश फालक,अविनाश भोळे, उमाकांत जावळे , स्वाती भोळे, नयना जावळे ,मनीषा पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर काव्यसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दुपारी ४:३० मिनिटांनी सुरू झालेले काव्यसमेलन रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होते.



