भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात पालिकेतर्फे अत्यल्प उपाय योजना करण्यात आल्या आहेत. भुसावळ शहर हे रेड झोन मध्ये आहे मात्र अजूनही पालिकेतर्फे कोणत्याही ठोस उपाय कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता केले जात नसल्याची तक्रार करून निवेदनात नमूद असलेल्या उपाय योजना त्वरीत अमंलात आणाव्या अशी मागणी वजा तक्रार मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचेकडे भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस पवन बुंदेले यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .तसेच उपायोजना व मागण्या पूर्ण न केल्यास याविरोधात व्यापक स्वरूपात आंदोलन छेडले जाईल,असा इशारा सुद्धा पवन बुंदेले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
निवेदनात नमूद आहे की, जळगाव जिल्ह्यासह भुसावळ शहर हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे शहरात कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंता वाढली आहे. ज्या विभागांमध्ये वा प्रभागांमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत. अशा परिसरांमध्ये तसेच संपूर्ण शहरामध्ये नगर पालिका प्रशासनाकडून या विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी अत्यावश्यक अशा उपाय योजना केलेल्या दिसत नाही. सदर बाधित भाग व शहरातील प्रत्येक प्रभाग पूर्णपणे निर्जंतुक केलेला दिसत नाही. सदर कोरोना बाधित प्रभागातील व शहरातील प्रत्येक नागरिकाची घरोघरी जाऊन त्याची तपासणी केलेली दिसत नाही. हे शहराच्या, नागरिकांच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. तसेच संबंधित आरोग्य व स्वच्छता कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनासुद्धा यासंदर्भात आवश्यक अश्या सेवा सुविधा पुरवण्यात येत नसल्याने त्यांचे सुद्धा आरोग्य प्रचंड धोक्यात आलेले आहे. त्यामुळे नगरपालिका भुसावळ प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड चीड संताप व्यक्त होत आहे. अशा वेळी कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर आपण भुसावळ शहरातील प्रत्येक नागरिकांची सक्तीचीआरोग्य तपासणी करावी, भुसावळ शहरातील सर्व नागरिक, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी , पोलीस कर्मचारी , अत्यावश्यक सेवा देणारे सर्व विविध विभागांचे कर्मचारी, यांना याबाबत आवश्यक असणारे सर्व साहित्य सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कोरोना बाधित प्रभाग दररोज निर्जंतुक करण्यात यावा, भुसावळ शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये एक दिवस आड निर्जंतुकीकरण करण्यात यावे. यासाठी आवश्यक असणारी वाहनांची संख्या वाढवण्यात यावी. शहरांमध्ये नागरिकांना जर मूलभूत समस्या भेडसावत असतील जसे की (पिण्याचे स्वच्छ शुद्ध पाणी न मिळणे, गटारींची स्वच्छता, बंद स्ट्रीट लाइट्स वगैरे) तर त्या सर्व समस्यां मुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये, म्हणून त्वरित अशा सर्व समस्यांचे, तक्रारींचे त्वरित निवारण करण्यात यावे.
, यासह भुसावळ शहर हे रेड झोनमध्ये शासनाने घोषित केलेले असल्यामुळे व शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्ण व संशयित रुग्ण संख्या याबाबत आपण गांभीर्याने विचार करून भुसावळ शहर भुसावळ शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून, भुसावळ शहर कोरोना मुक्त करून त्याला ग्रीन झोन कडे नेण्यासाठी आपण वरील सर्व बाबी, समस्या जातीने लक्ष घालून त्वरित दूर कराव्यात आमच्या भुसावळकर यांच्या हितासाठी वरील मागण्या युद्धस्तरावर त्वरित पूर्ण कराव्यात. ज्या उपाययोजना करण्यासाठी आपणाकडे पुरेसे मनुष्यबळ नसेल तर भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, याकामी आपणास स्वयंसेवक म्हणून मदत करण्यास तयार आहे., तसेच वरील उपाय योजना करण्यासाठी आपण भुसावळ शहरातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, यांना विश्वासात घेऊन याबाबत आवश्यक अशा सर्व उपाययोजना कामी मदत घ्यावी. त्यांना सर्वांना यामध्ये सहभागी करून घ्यावे तसेच वरील सर्व उपायोजना व मागण्या पूर्ण न केल्यास याविरोधात व्यापक स्वरूपात आंदोलन छेडले जाईल,असा इशारा सुद्धा भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस पवन बुंदेले यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे .याबाबत आमदार संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी जळगाव यांना सुद्धा निवेदन प्रत रवाना केली आहे .



