मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व कायम ; साधना महाजन यांचेसह सहा नगरसेवक बिनविरोध ; जामनेरात भाजपात जल्लोष ;


जळगाव (प्रतिनिधी ) – , जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मंगळवारी (ता. १८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेकांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाले . या प्रक्रियेदरम्यान भाजपाचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निश्चीत झाले आहे. यात भुसावळ येथे वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ ब मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ अ मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निश्चीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी अनेक मातब्बरांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. दरम्यान, मतदान होण्या आधीच भाजपाने जिल्ह्यात तीन ठिकाणी खाते उघडून आघाडी घेतली आहे.

हा विजयाचा शंखनाद वाजला व आज पुन्हा एक मोठी बातमी समोर आली असून, जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विशेषतः यामुळे साधना महाजन यांनी बिनविरोध हॅट्रिक साधली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात नवा अध्याय दिला गेला आहे.जामनेर नगरपरिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर व सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक पदाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे बिनविरोध झालेल्या तीनही नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तीन जागांवर भाजपला बिनविरोध करण्याला यश मिळाले आहे

जामनेरात ६ नगरसेवक देखील बिनविरोध, मंत्री महाजनांची जादू कायम !
येथील नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत. ही त्यांची आता तिसरी टर्म आहे. तर ६ नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आल्याने भाजप तर्फे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नगराध्यक्ष पदासाठी साधना गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज उरला. त्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक ११ ब मधून उज्वला दीपक तायडे, प्रभाग क्रमांक १ अ मधून सपना रविंद्र झाल्टे, प्रभाग क्रमांक १३ अ मधून महेंद्र कृपाराम बाविस्कर, १३ ब मधून किलूबाई गीमल्या शेवाळे, प्रभाग क्रमांक २ मधून श्रीराम महाजन,तर प्रभाग क्रमांक ५ अ मधून संध्या जितेंद्र पाटील हे सुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे मंत्री महाजनांची जादू कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे .