भुसावळ (प्रतिनिधी ) – अवैध वाळू वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच घेणाऱ्या तिघांना एसीबी पथकाने रगेहाथ पकडल्याने महसुल विभागान खळबळ उडाली आहे. भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल व खाजगी पंटराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई सोमवार, ऑक्टोंबर रोजी दुपारी करण्यात आली आहे. तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वराडसीमचे तलाठी नितीन पंडित केले याने तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाच मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीची गंभीर दखल घेत एसीबीच्या पथकाने लगेच सापळा रचण्याची तयारी केली. त्यानुसार पथकाने पडताळणीसाठी सापळा रचला.

भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात तलाठी नितीन पंडित केले, कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव राहणार दर्यापूर आणि एका खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी रा तिघरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ७३ हजार रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत तलाठी नितीन पंडित केले, सोबत असलेला कोतवाल आणि खाजगी पंटर अशा तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्याचे काम सुरू होते . जळगाव एसीबीचे पोलिस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.


