प्रभाग ८ प्रारूप मतदार यादीत असंख्य चुका… प्रा. धिरज पाटील यांची थेट निवडणूक आयोगात तक्रार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका निवडणूक २०२५ साठी भुसावळ नगरपालिका तर्फे नविन प्रभाग क्र. ८ ची प्रारूप मतदार यादी कार्यक्रम राबविताना अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची तक्रार प्रा. धिरज पाटील यांची थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेश व सुचनाकडे दुर्लक्ष करून निवडणुकीसारख्या महत्वाच्या कामकाजात गांभीर्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंतिम प्रभाग रचनेत नमूद नसलेल्या गवळी वाडा, सुतार गल्ली, गमाडिया प्रेस, फकिरवाडा न्यु सातारा फाईल, कुटे गल्ली, मामाजी टॉकीज परिसर, महात्मा फुले नगर, हबंडर्डीकर चाळ, हिरकणी शेटचा वाड़ा, जवाहर हाटेल जवळील भाग, इमाम वाडा, बौध्द वाडा परीरातील सुमारे ७५० पेक्षा जास्त नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक ८ च्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले कसे ?

शेकडो दुबार नावे असून मृत नावेही समाविष्ट आहेत. बीएलओना सूचना दिल्यानंतरही त्यावर कार्यवाही न झाल्याने या प्रभागात साडे दहा हजार मतदार आहेत. २०२२ ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यावेळीच्या अंतीम मतदार यादीत व आताच्या प्रारूप यादीत खुप मोठा फरक आहे. या ठिकाणी लोकसंख्या पेक्षा जास्त मतदार झाले आहेत ते आले कुठून असा सवाल निर्माण झाला आहे. प्रभाग रचना बदललेली नसताना मतदार वाढले आहेत, काही ठिकाणी नावे दुसऱ्या प्रभागात लावली गेली आहेत. या सगळ्या प्रकारामुळे अनेक मतदार यांना त्यांच्या हक्काच्या प्रभागात मतदान करता येणार नाही, ते वंचित राहतील.

न्यायालयात धाव घेणार आहे- प्रा. धिरज पाटील

नावातील दुरुस्तीबाबत मतदारांनी दुरुस्ती करावयाची असल्यास नगर परिषद कार्यालयामध्ये सोमवार (ता. १३) पर्यंत अर्ज उपलब्ध केले आहेत. ज्या निवासस्थानी राहतो त्या ठिकाणचा पुरावा आणि आधार, मतदार नोंदणीचे कार्ड, वीज बिल कर भरल्याची पावती, मिळकत उतारा सोबत जोडावा लागेल. यामध्ये नागरिकांची दमछाक होणार आहे. पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पडेल यासाठी निवडणूक आयोगात तक्रार केली आहे, गरज भासल्यास न्यायालयात न्याय मिळविण्यासाठी धाव घेणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.