नाहाटा महाविद्यालयात रसायनशास्त्राची CPCS-2025 राष्ट्रीय परिषद संपन्न


भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय ‘रसायनशास्त्रातील बदलते परिमाणे’ (CPCS-2025) या विषयावर सलग पाचवी द्विवार्षिक राष्ट्रीय परिषद २९ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. या परिषदेसाठी अससोसिएशन ऑफ केमिस्ट्री टिचर्स सह आयोजक होते.
सदर परिषदेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांच्या हस्ते झाले याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन श्री. महेश फालक, सचिव श्री. विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष श्री संजयकुमार नाहाटा, डॉ. विनोद चौधरी, (सी.एस.आय.आर. – आय.एम.टेक. चंदिगढ), डॉ. संजोग नगरकर (आय.आय.टी . मुंबई), डॉ. सौरभ श्रीवास्तवा (मणिपाल विद्यापीठ जयपूर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रा. जी. एच. सोनवणे (BOS चेअरमन), उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, डॉ. डी. एन. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. डी. येवले, समन्वयक डॉ. सी. एच. सरोदे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. कोलते व डॉ. क्षिरसागर उपस्थित होते.
या परिषदेत पहिल्या सत्रात माननीय डॉ. विनोद चौधरी, यांनी सध्या मल्टि ड्रग रेसिस्टन्ट इन्फेक्शन्स शी सामना करू शकतील अश्या अँटिबायोटिक उपलब्ध नाहीत याबद्दल माहिती दिली. त्यांनी सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री मधील अँटीबॅक्टेरियल ड्रग रेझिस्टन्स या विषयावरील त्यांच्या लॅब मधील अद्ययावत संशोधन बद्दल माहिती दिली. त्यानंतर डॉ. संजोग नगरकर यांनी मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क वरील अद्ययावत संशोधनाची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या रिसर्च ग्रुप मध्ये सुरु असलेल्या डीझाईनिंग ग्लासी अन्ड लिक्विड स्टेट्स ऑफ मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क या विषयावर माहिती दिली
दुसऱ्या सत्रात डॉ. सौरभ श्रीवास्तवा यांनी थेरॉटिकल केमिस्ट्री चा वापर करून विविध संयुगांच्या मोलेक्युल लेव्हल ला जाऊन त्यांच्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चा अभ्यास कसा करता येतो याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी मॉलिक्युल गिअर्स मधील रोटेशनल एनर्जी ट्रान्सफर आणि अश्या प्रकारचे मॉलिक्युल डिझाईन करताना काय अडचणी येतात याबद्दल माहिती दिली.
या परिषदेमध्ये एकूण 260 पेक्षा जास्त विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक सहभागी झाले होते. तसेच 60 पेक्षा जास्त संशोधकांनी पोस्टरद्वारे त्यांचे संशोधनाचे सादरीकरण केले.
परिषदेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच. बऱ्हाटे अध्यक्षस्थानी होते. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. बऱ्हाटे यांनी विज्ञान विषयातील वैशिष्ट्यपूर्ण कामाची नवीन पिढीतील संशोधकांमध्ये जाणीव वृद्धिंगत व्हावी यासाठी अशा परिषदांचे आयोजन महत्वाचे ठरते असे मत मांडले. या परिषदेसाठी IDBI Bank, LIC of India, Bank of Maharashtra आणि आर. जी. एल. फूड्स लिमिटेड यांनी स्पॉन्सर म्हणून मदत केली.
परिषदेचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. सी एच सरोदे यांनी केले. या परिषदेसाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख परिषदेचे चेअरमन डॉ. एस. डी. येवले, परिषदेचे सचिव डॉ. सचिन कोलते व डॉ. अजय क्षिरसागर, परिषदेच्या कोषाध्याक्षा डॉ. संगीता भिरूड, डॉ. विलास महिरे, डॉ. उमेश फेगडे, डॉ. नीलिमा पाटील, प्रा. तेजश्री झोपे, प्रा. धनश्री बरडे, प्रा. सागर सोनवणे, प्रा. प्रशांत पाटील तसेच रसायनशास्त्र विभागातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ –
CPCS-2025 परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहन फालक अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आणि व्यासपीठावर इतर मान्यवर.