राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा.संजय सावकारेच्या उपस्थितीत भुसावळात 18 रोजी’सेवा पंधरवाडा’ कार्यक्रमाचे उद्घाटन “


भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने भुसावळ उपविभागातील भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये विविध शासकीय योजनांच्या अनुषंगाने कार्यक्रम राबवले जातील.

या उपक्रमाचा भुसावळ तालुकास्तरीय मुख्य कार्यक्रम 18 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. संजय वामन सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

या दिवशी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे, विविध योजनांचे अर्ज स्वीकारणे, स्वयं-सहायता बचत गटांना कर्जवाटप, महा डीबीटी योजनेसाठी अर्ज भरून घेणे, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, माझी कन्या भाग्यश्री योजना, नवीन मतदार नोंदणी, ई-रेशन कार्ड नोंदणी, महसूल आणि अतिक्रमणविषयक कामकाज, सामाजिक सुरक्षा योजनांचे मार्गदर्शन, शेतीविषयक सुविधा, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठीच्या योजना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रमाणपत्रे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भुसावळ तालुक्यातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांनी केले आहे.