भुसावळात हाकर्सना हटविण्यासाठी दुकानदारांचे उपोषण ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील अप्सरा चौकामधील अनधिकृत लोटगाडीधारक हॉकर्स यांना हटविण्यात निक्की रमेशलाल बत्रा माजी नगरसेवक व व्यापारी वर्ग हे संतप्त झाले असून त्यांनी १० रोजी उपोषणाला असून आंदोलनास सुरवात केली आहे .
याबाबत अप्सरा चौक येथे सार्वजनिक बाधकाम विभागाने रोड बनविला व त्यात दुभाजक टाकले त्यामुळे आता सदरअनधिकृत हॉकर्स यांनी ठेलागाडी लावल्याने जागा राहिली नाही. त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम होऊन बाजारात जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते व ह्या गोष्टी मुळे आमच्या दुकानान ग्राहक येण्यास तयार नाही आता पुढील महिन्यात दसरा, दिवाळी आहे त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल म्हणून दि १०/९/२०२५ पासून सकाळी १० वाजे पासून अप्सरा चौक, बाजार वार्ड येथे आमरण उपोषणास करीत आहे
सर्व व्यापारी बांधव गेल्या ५० वर्षांपासून बाजारपेठेत आपला उदरनिर्वाह करत आहोत सर्व व्यापारी वेळेवर नगरपालिकेचा कर भरतो एखादी वेळ कोणी कर भरत नाही तर नगरपालिकेकडून आमच्या दुकानांना सील पण केले जाते, येवढ्या प्रमाणात कर भरत असताना सुध्दा व्यापारी बांधवांना काही एक सुविधा मिळत नाही

आमच्या दुकानां समोर हातगाडी वाले त्यांचा गाड्या लावतात त्यांच्या अतिक्रमणामुळे दुकानांवर येण्यासाठी ग्राहकांना जागा नाही हॉकर्स बांधवांमध्ये नेहमी वाद विवाद होत राहतात या अनेक समस्यांनी दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे हॉकर्स यांना एक आठवड्यात स्थलांतरित करावे असे निवेदन नगरपालिका मुख्यअधिकारी राजेंद्र फातले यांना दिले होते परंतु याबाबत काही कार्य झाल्यामुळे नगरसेवक निकी बत्रा व सर्व व्यापारी उपोषणा करिता बसत आहे आज भुसावळ मधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले आहे अशी माहिती निक्की रमेशलाल बत्रा माजी नगरसेवक यांनी दिली आहे .

दरम्यान या उपोषणाला मा नगरसेवक महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर यांनी सुद्धा पाठींबा दिला असून उपोषणात सहभागी झाले .