मुसळधार पावसामुळे धरणगावातील दुकानदारांचे नुकसान ; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित भरपाई द्यावी – शिवसेना उबाठाची मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिक यांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी उबाठा शिवसेना पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी केली आहे .

धरणगांव येथे मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने धरणी चौक परिसरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून अतोनात नुकसान झाले, तसेच शहरातील अनेक भागात बऱ्याच घरांची पडझड झाली त्यात अनेक संसारपयोगी सामानाचे नुकसान झाले, हे वृत्त समजताच सकाळी ७ वा शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,शहर प्रमुख भागवत आप्पा चौधरी, सुरेश गोविंदा महाजन, व्यापारी सेनेचे दिनेश वाणी, रणजित पुरभे, गजानन माळी, राहुल रोकडे आबा महाजन ,व व्यापारी यांनी सर्व पाहणी केली,

दरम्यान उपनेते गुलाबराव वाघ यांनी तात्काळ प्रांताधिकारी व तहसीलदार, मुख्याधिकारी धरणगांव, सर्कल, तलाठी यांच्याशी संपर्क करुन ताबडतोब पंचनामा करणे,पाहणी करणे संदर्भात सूचना केली.या नुकसान ग्रस्ताना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी ताबडतोब यंत्रणा पाठवतो व आम्हीही येतो असे तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी सांगितले.