शिक्षण मंत्री व शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा झाल्याने सामुहिक रजा आंदोलन स्थगित ;


जळगाव (प्रतिनिधी ) –
नागपूर येथे बोगस क्षणार्थ आयडी प्रकरणी अधिकाऱ्यांना अटक केल्याने
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र यांनी मंगळवारी शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासोबत बैठक होऊन मागण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असून बुधवारपासून पूर्ववत शिक्षण विभागाचे काम सुरू होणार आहे यामुळे संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री दादा भुसे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग रनजित सिंह देओल, सोबत संघटनेचे पदाधिकारी व सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक यांची सकारात्मक चर्चा झाली यावेळी नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी दि.०७.०८.२०२५ च्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी. विनाचौकशी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अटक करु नये शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनस्र्थापित करण्यात यावे.अतिरिक्त कामांच्या ताणाबाबत कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त होणाऱ्या व्ही.सी. बाबत चर्चा झाली.

वरील सर्व मागण्यांबाबत मा. मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदय यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी यांचेसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहे. संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरुन कळविण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन मा. मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदय यांनी दिलेले आहे. त्यामुळे संघटनेचे दि.०८.०८.२०२५ पासून सुरु असलेले सध्याचे बेमुदत सामुहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

यापुढे अशा प्रकारची विनाचौकशी नियमबाह्य पध्दतीने अटक झाल्यास स्थगित केलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरु केले जाईल. त्यामुळे सर्व शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवार दि.१३.०८.२०२५ पासून पूर्ववत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यामुळे सात ऑगस्टपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांचे व कार्यालयीन कामकाज सुरळीत होईल या कार्यामध्ये काही दिवसांपासून काढतात झाला होता तसेच सर्व कामे ठप्प झाली होती .